महात्मा ज्योतीबा फुले March 8, 2006
Posted by neelkant in माहिती, व्यक्ती परिचय.4 comments
१८२८ – जन्म कटगूण सातारा
१८३४ ते १८३८ – पंतोजीच्या शाळेत शिक्षण झाले.
१८४० – सावित्रीबाईंशी विवाह.
१८४१ ते १८४७ – स्कॉटिश मिशन हाय स्कूल मध्ये इंग्रजी शिक्षण घेतले
१८४७- लहूजी बुवांकडे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
१८४७ – थॉमस पेन यांच्या ‘राईट ऑफ मॅन’ या ग्रंथाचा अभ्यास.
१८४८ – मित्रांच्या विवाहप्रसंगी मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला
१८४८ – भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
७ सप्टेंबर १८५१ – चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरवात.
१८५२ – पुना लायब्ररीची स्थापना.
१५ मार्च १८५२ – वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१६ नोहेंबर १९५२ – मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकार तर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
१८५३ – ‘दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ऍन्ड अदर्स’
१८५४ – स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी स्वीकारली
१८५५ – रात्र शाळेची सुरवात केली
१८५६ – मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
१८५८ – शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
१८६० – विधवा विवाहास साहाय्य केले.
१८६३ – बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
१८६५ – विधवा केशवपणा विरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
१८६४ – गोखले बागेत विधवा विवाह घडवून आणला.
१८६८ – दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
१८७३ – सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१८७५ – शेतकऱ्यांच्या शोषणा विरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
१८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
१८७६ ते १८८२ – पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
१८८० – दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
१८८२ – ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा’ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
१८८७ – सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व पूजाविधी यांची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरवात केली
१८८८- ड्युक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
१८८८ – मुंबईतील कोळीवाडा येथे रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते जनते तर्फे सत्कार करून ‘महात्मा’ ही पदवी प्रदान करण्यात आली. २८ नोव्हेंबर १८९० – पुणे येथे निधन झाले.
ज्योतीरावांची ग्रंथसंपदा
नाव | साहित्यप्रकार | लेखन काळ |
१) तृतीय रत्न | नाटक | १८५५ |
२) छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा | पोवाडा | १८६९ |
३) ब्राह्मणांचे कसब | १८६९ | |
४)गुलामगिरी | १८७३ | |
५)शेतकऱ्यांचा आसूड | १८८३ | |
६)सत्सार१ सत्सार २ | १८८५ | |
७)इशारा | १८८५ | |
८)सार्वजनिक सत्यधर्म | ग्रंथ | १८९१ (मृत्यूनंतर प्रकाशीत ) |
९)अखंड | काव्य रचना |
- ‘गुलामगिरी‘ ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णियांना समर्पित केला.
- ‘अस्पृश्यांची कैफियत’ हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
- मूळ गाव – कटगुण (सातारा)
- गोऱ्हे हे मूळ आडनाव.
- ज्योतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.
- सावित्रीबाईंना प्रशिक्षित करून शिक्षणकार्यास प्रवृत्त केले.
- सावित्रीबाई देशाच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत.
- स्वतंत्रपणे मुलींसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
- १८८० – नारायण मेधाजी लोखंडे यांना ‘मील हॅण्ड असोसिएशन’ या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
बाबा आमटे March 6, 2006
Posted by neelkant in माहिती, विदर्भ, व्यक्ती परिचय.add a comment
बाबा आमटे
मुरलीधर देवीदास आमटे
जन्म – १९१४
१९५८ – रॅमन मॅगसेसे पुरस्कार
१९८६ – पद्मविभूण, पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार
१९८८ – मानवी हक्क पुरस्कार .
१९९० – टेंपल्ट पुरस्कार .
१९९१ – राईट लाइव्हली हुड पुरस्कार .
पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार .
१९९९ – म. गांधी पुरस्कार .
कुष्ठरोग्यांसाठी संस्था स्थापन केल्या –
सोमनाथ – मूल(चंद्रपूर)
आनंदवन – वरोरा (चंद्रपूर)
अशोकवन – नागपूर
नागेपल्ली , हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प.
‘ज्वाला आणि फुले’ हा काव्यसंग्रह
‘उज्ज्वल उद्यासाठी’ (काव्य)
‘माती जागवील त्याला मत’
थोर समाजसुधारक
कुष्ठरोग निर्मूलन , पुनर्वसन
आनंदवन मूळच्या खडकाळ जमीनीत शेतीविषयक विविध प्रयोग.
राष्ट्रीय एकात्मतेचे कट्टर पुरस्कर्ते
१९८५ – शंभर दिवसांचे भारत जोडो आंदोलन .
नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व
सामाजिक नैसर्गिक पर्यावरण क्षेत्रात सक्रिय कार्य.
डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख) March 6, 2006
Posted by neelkant in माहिती, विदर्भ, व्यक्ती परिचय.add a comment
मूळ आडनाव – कदम
जन्म – २७ डिसेंबर १८९८, पापळ (अमरावती ) येथे
मृत्यू – १० एप्रिल १९६५ दिल्ली येथे.
१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी ‘महाराष्ट्र केसरी’ हे वर्तमानपत्र चालविले.
वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.
१९३३ – शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.
१९२६ – मुष्ठीफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.
१९२७ – शेतकरी संघाची स्थापना.
१९३२ – श्री. ए. डब्ल्यु. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना .
ग्रामोध्दार मंडळाची स्थापना.
१९५० – लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रुपांतर करण्यात आले.
१९५५ – भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने ‘राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.
१९५६ – अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.
‘भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा’.
१८ ऑगस्ट १९२८ – अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .
१९३० – प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री
लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.
१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषीमंत्री. भारताचे पहिले कृषीमंत्री.
देवस्थानची संपत्ती सरकाराने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देश्याने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.
१९६० – दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.