jump to navigation

माझ्या अकोला जिल्ह्या विषयी January 30, 2006

Posted by neelkant in माहिती.
add a comment

अकोला शहर

हे शहर पश्चिम विदर्भातील एक महत्वाचे शहर आहे. या शहराचे भौगोलिक स्थान २०.४६ उत्तर व ७६.५९ पूर्व आहे.(स्रोत – गुगल अर्थ) हे शहर मोर्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. ही नदी पुर्णा नदीची एक मुख्य उपनदी आहे. शहराचे क्षेत्रफळ ५,४३१ चौ.किमी. आहे. लोकसंख्या १६२९३०५ आहे.(२००१ ची जणगणना)
अकोला जिल्हा

अकोला जिल्हा हा विदर्भाच्या अमरावती या प्रशासकीय विभागात येतो.

अकोला जिल्ह्यात सात तालुके आहेत.

अकोला

अकोट

तेल्हारा

मुर्तीजापुर

बाळापुर

पातुर

अकोला जिल्ह्यात नरनाळा , अकोला, अकोट आणि बाळापुर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे. उष्ण व विषम तापमानाचा हा जिल्हा असून तापमान कक्षा जास्त आहे. त्यामुळे उन्हाळा अतिशय उष्ण तर हिवाळा अतिशय थंड असतो.

जिल्हा हा तापी – पुर्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. मुख्य नदी पुर्णा आहे. जिल्ह्यातील इतर नद्या – उमा , काटेपुर्णा, मोर्णा, शहानुर, मन, आस, विश्वामित्री, निर्गुणा, गांधारी, आणि वान. काटेपुर्णा, उमा आणि वान नदींवर धरण बांधण्यात आले आहे.

मुंबई ते कोलकाता या मध्य रेल्वेमार्गातील अतिशय महत्वाचे जोडस्थानक आहे. तसेच अजमेर – पुर्णा या मीटर गेज मार्गावरील महत्वाचे जोडस्थानक आहे. जिल्ह्यातील इतर महत्वाचे जोडस्थानक म्हणजे मुर्तीजापुर . येथे एक स्वतंत्र मार्ग मुख्य रेल्वेला जोडल्या जातो. तो म्हणजे अचलपुर – मुर्तीजापुर तसेच मुर्तीजापुर – यवतमाळ.

जिल्ह्यातील जमीन काळी कसदार (रेगुर ) आहे. मुख्य पीक कापूस व तेलबिया आहे. खरीप ज्वारी उत्पादनात अकोला जिल्ह्याचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक आहे.

पारस हे महाराष्ट्रातील महत्वाचे औष्णिक विद्युत केंद्र या जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यात आहे.

अकोल्यातील राजराजेश्वर, गायगावचा श्री गणेश, वारी भैरवगड चा मारोती, काटेपुर्णाची चंडीकादेवी, पातुरची रेणुका माता ही भाविकांच्या आकर्षणाची मुख्य केंद्रे आहेत. संत गजानन महाराजांचे शेगाव येथून ५० किमी अंतरावर आहे.

January 29, 2006

Posted by neelkant in माहिती.
add a comment

या अनुदिनी वर आपले स्वागत आहे.